इन्स्टिट्यूट ऑफ डिस्टन्स अँड ओपन लर्निंग (IDOL) -
मुंबई विद्यापीठ

सुरू करत आहे

सायबर सिक्युरिटी कोर्स

युनिवर्सिटी ग्रँटस कमिशन (यूजीसी) अनिवार्य (मॅंडेटेड) ४ क्रेडिटस

support@skillone.in

+91 9529145876
(Mon-Sat 10 am to 6 pm)

यूजीसी अनिवार्य (मॅंडेटेड) ४ क्रेडिट्स
सायबर सिक्युरिटी कोर्सविषयी

यूजीसी अजेंडा आणि कोर्सची गरज

इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीची (ICT) उत्क्रांती आणि सुरक्षेची वाढती चिंता लक्षात घेता सायबर सुरक्षेच्या मुद्द्यावर लवचिक फ्लेग्जिबल आणि सामान्यत: सर्वसमावेशक दृष्टिकोनाची आवश्यकता आहे. ICT च्या झपाट्याने होत असलेल्या वाढीमुळे विविध गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण झाले आहेत, ज्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. सायबर सुरक्षेकडे व्यापकपणे, तसेच त्याच्या मुळाशी जाऊन बारकाईने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे, जेणेकरून नॉन टेक्निकल शाखांमधील विद्यार्थ्यांनाही सायबर सुरक्षेच्या समस्या अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेता येऊ शकतील. अधिक जागरूक आणि जबाबदार डिजिटल नागरिक तयार करण्याच्या उद्देशाने हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे, ज्यामुळे एकूणच अनुकूल सायबर सुरक्षा आणि इकोसिस्टममध्ये प्रभावीपणे योगदान दिले जाईल.

संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था, शिक्षण, प्रशासन आणि संरक्षण हे डिजिटल झाले आहे. आज आपण जवळजवळ प्रत्येक गोष्टीसाठी तंत्रज्ञानावर अवलंबून आहोत. हे आपले जीवन सोपे, वेगवान आणि चांगले बनवते, परंतु ते काही जोखीम आणि आव्हाने देखील घेऊन येते.

अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तिला स्वतःचे, संस्थेचे आणि समुदायाचे रक्षण करण्यासाठी आणि आर्थिक किंवा प्रतिष्ठेच्या नुकसानीची भीती न बाळगता टेक्नॉलॉजीचा योग्य फायदा करून घेण्यासाठी सायबर सुरक्षेचे महत्व समजून घेणे व त्याचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे.

Matrix movie still
IDOL विद्यापीठाने एकीकडे विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यपूर्णतेची तीव्र भावना आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याची गरज आणि दुसरीकडे त्यांच्या कौशल्याला न्याय देणाऱ्या करिअरच्या व्यवहार्य संधी उपलब्ध करून देण्यात मोठी प्रगती केली आहे. या हेतूच्या पूर्ततेसाठीच IDOL विद्यापीठाने उद्योगांमध्ये प्रकर्षाने मागणी असलेले उदयोन्मुख स्किल्स सेट वितरित करण्यासाठी एक माध्यम म्हणून स्वतःला सादर केले आहे. अशा प्रकर्षाने मागणी असलेल्या कौशल्यांपैकी एक म्हणजे सायबर सुरक्षा हे एक कौशल्य आहे.

टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल सर्व शाखांच्या पदवी (युजी) आणि पदव्युत्तर (पिजी) विद्यार्थ्यांसाठी

लर्निंग मॉड्यूल

हा कोर्स ४ क्रेडिट्सचा असून तो ५ मॉड्यूल्समध्ये विभागलेला आहे. प्रत्येक मॉड्यूल हे पुढे वेगवेगळ्या चाप्टर्समध्ये विभागले गेले आहेत.

an abstract photo of a curved building with a blue sky in the background

यूजीसीने सर्व विद्यापीठांमधील सर्व शाखांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर स्तरावर सायबर सुरक्षा अभ्यासक्रम राबविण्यासाठी विविध परिपत्रके दिली आहेत आणि अभ्यासक्रम देखील उपलब्ध करून दिलेला आहे.

यूजीसीने सर्व विद्यापीठांमध्ये सायबर सिक्युरिटी विषयात समान अभ्यासक्रम राखण्यासाठी आणि शिक्षणाचा समान दर्जा ठेवण्यासाठी हा अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला आहे. या अभ्यासक्रमाचे उद्दीष्ट अधिक जागरूक आणि जबाबदार डिजिटल नागरिक तयार करणे आहे.

लर्निंग मेथडोलॉजी

संगणक आणि मोबाइल डिव्हाइसवर कोर्स उपलब्ध

आपल्या वेळेप्रमाणे कधीही, कुठेही कोर्स शिका

ऑनलाइन शिक्षण

LMS मध्ये आयडी आणि पासवर्ड टाकून लगेच लर्निंग चालू


शिकण्याचा एक नवीन अनुभव

कंटेण्ट श्रेणी

टेक्स्टबुक

प्रॅक्टिकल व्हिडिओ

कंसाईज गाईड

मल्टीमीडिया व्हिडिओ

सराव प्रश्न

असाइनमेंट्स